.... बच्चनचे सिनेमेही फ्लॉप होतात- सुप्रिया सुळे


पुणे - 
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. पार्थ पवार यांच्या रूपाने पवार कुटुंबाला पहिला पराभव पाहावा लागला. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पराभव झाला तर काय झालं ? पराभवाने खचायचे नाही.. अमिताभ बच्चनचे सिनेमेही फ्लॉप होतात, अस म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा जोशात विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

पार्थसहित सगळ्या उमेदवारांना माझं हेच सांगने असेल की पराभवाने खचून जाऊ नका. पुन्हा जोशात कामाला लागा, अस सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बारामतीत मिळालेला विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. हा विजय मी जनतेला समर्पित करते, असंही सुळे म्हणाल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post