शहरात भाजपाचा प्रचार करणाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न


अहमदनगर - 
लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. असाच प्रकार मतदानानंतर नगर तालुक्यातील शिराढोन येथे मतदानानंतर घडला होता. मात्र असाच प्रकार मतमोजणीच्या दिवशी नगर शहरातील गांधी मैदान येथे गुरुवार (दि.२३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला. समीर गवळी (रा.शिला विहार, गुलमोहोर रोड) यांने फिर्याद दिली आहे.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सूरज सुभाष जाधव, ऋषिकेश (भैय्या) कैलास डहाळे, दर्शन करंडे यांच्यासह ४ ते ५ जणविरोधात ३०७ सह विविध कलमानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सूरज जाधव व ऋषिकेश डहाळे या दोघाना ताब्यात घेण्यात आले आहे.

फिर्यादी गवळी याचा पुतण्या आदित्य संजय गवळी (वय २२)हा गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास गांधी मैदान परिसरात थांबला होता. लोकसभा निवडणुकीत तू भाजपाचा प्रचार का केला असे म्हणत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुरज जाधव याच्यासह ४ ते ५ जणांनी आदित्य याला लाकडी दांडक्यानी बेदम मारहाण करत डोक्यावर काचेच्या बाटल्या फोडत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post