'या' गद्दारांना पक्षातून बाहेरचा रस्ता - बसपा


मुंबई : 
बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूका स्वबळावर लढवल्या. मात्र, पक्षाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पक्षाचे प्रदेश सचिव नागोराव जयकर, सोलापूरचे उमेदवार राहुल सरोदे, नागपूरचे उमेदवार मोहम्मद जमाल शेख आणि औरंगाबदचे जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, नगरसेवक आनंदा चंदनशिवे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.बहुजन समाज पक्षाने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूका लढवल्या. परंतु, पक्षाला खातेही उघडता आले नाही. पक्षाचे संघटन चांगले होते. परंतु वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि रिपाईमुळे मोठ्या प्रमाणात दलित मतांचे विभाजन झाले. त्याचा फटका या पक्षांना बसला. बहुजन समाज पक्षाचे सोलापूर मतदारसंघातील उमेदवार राहुल सरोदे, नागपूरचे उमेदवार मोहम्मद जमाल, औरंगाबादचे नगरेसवक, जिल्हाध्यक्ष महेंद्र सोनवणे, सोलापूरचे नगरसेवक आनंदा चंदनशिवे यांनी निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केले. त्यामुळे एका प्रकारे पक्षाशी बेईमानी केली. याच्या तक्रारी पक्षाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post