पाक पंतप्रधानांकडून मोदींचे अभिनंदन


इस्लामाबाद – 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दूरध्वनी करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांतील लोकांच्या उज्जवल भवितव्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छाही खान यांनी व्यक्त केल्याची माहिती पाकिस्तानी विदेश मंत्रालयाने दिली आहे.

इम्रान खान यांनी मोदींना फोन करण्याआधी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले होते. इम्रान खान यांनी दक्षिण अशियात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य नांदावे यासाठी भारताच्या सहकार्याने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post