अफलातून : डोळ्यांचे पारणे फेडणारे पंतप्रधानांचे निवासस्थान...!


नवी दिल्ली
१२ एकरात आहेत डोळ्याचे पारणे फेडणारे पाच बंगले ! बघा कसे आहे पंतप्रधानांचे निवासस्थान. २०१९ हे वर्ष राजकारणाच्या दृष्टीने फार महत्वाचे वर्ष आहे. लोकसभा निवडणुकांचे मतदान संपले आहे. दोन दिवसाने त्यांचा निकाल आहे. त्याबरोबरच देशाचा पुढचे पंतप्रधान कोण असेल हे सुद्धा लवकरच कळेल. एवढंच नाही तर राजधानी दिल्ली येथील लुटीयन झोनमधल्या ७ रेसकोर्स म्हणजेच पंतप्रधान भवनात पुढची पाच वर्ष कोण राहणार याचेही चित्र स्पष्ट होईल. चला तर आज जाणून घेऊ या

भवनाविषयी या गोष्टी…
१) दिल्लीत असणारे पंतप्रधान भवन १२ एकरांत विस्तारलेले असून हे एकूण पाच बंगल्याचे मिळून बनले आहे. १९८० मध्ये याची रचना करण्यात आली होती. यामध्ये पंतप्रधान कार्यालय, घर, गेस्ट हाऊस, सुरक्षा एसपीजी भवन अशा इमारती आहेत.

२) १९८४ मध्ये राजीव गांधी हे इथे राहणारे पहिले पंतप्रधान होते. १९२०-३० च्या दरम्यान रॉबर्ट टॉर रसेल यांनी या बंगल्याचा नकाशा बनवला होता. व्ही.पी.सिंग प्रधानमंत्री असताना या बंगल्याचा वापर सरकारी निवासस्थान म्हणून केला गेला.

३) पंतप्रधान भवनातील पाच बंगल्यांना १, ३, ५, ७, ९ असे नंबर आहेत. बंगला १ प्रधानमंत्र्यांचे हेलिपॅड आहे. बंगला ३ पाहुण्यांसाठी गेस्ट हाऊस आहे. बंगला ५ पंतप्रधानांचे खाजगी निवासस्थान आहे. बंगला ७ त्यांचे कार्यालय आहे तर बांगला ९ मध्ये एसपीजी सुरक्षारक्षक राहतात.

४) प्रत्येक बंगल्यांमध्ये दोन बेडरुम, एक साधी रम, एक डायनिंग रूम आणि एक बैठकीची खोली आहे. बैठकीच्या खोलीत एकाच वेळी ३० लोक बसू शकतात. इथे २ किमी लांबीचे एक भुयार असून ते थेट पंतप्रधान कार्यालयाला सफदरजंग विमानतळाला जोडते.

५) ७ रेसकोर्स मध्ये एक मोठा बगीचा असून त्यात गुलमोहर, सांवर आणि अर्जुनाची झाडे आहेत. बागेची शोभा वाढवण्यासाठी मोरांसोबत इतर अनेक पक्षांची घरटी बांधण्यात आली आहेत.

६) ७ रेसकोर्स पासून एक गल्ली पंचवटीकडे जाते. तिथे एक मोठे भोजनगृह आहे. त्याच्या भिंतीवर राष्ट्रीय आधुनिक कलासंग्रहातून आणलेल्या कलाकृती लावलेल्या आहेत. तसेच पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तू, पेंटिंग, स्मृतिचिन्ह यांनी ती भिंत सजवली आहे.

७) एखादा व्यक्ती पंतप्रधान भवनात जात असेल तर त्याला ९, लोककल्याण मार्ग इकडून प्रवेश मिळतो. त्याची कडक तपासणी केली जाते. पंतप्रधानांचे सचिव एसपीजी रक्षकांना भेटीला येणाऱ्यांची यादी देतात. पंतप्रधानांना भेटण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य आहे.

८) सुरक्षेच्या कारणास्तव प्रधानमंत्री भवनाच्या शेजारी असणाऱ्या गगनचुंबी सम्राट हॉटेलचे वरचे चार मजले सरकारने घेतले आहेत. संपूर्ण परिसर नो फ्लायिंग झोन घोषित केला आहे.

९) प्रधानमंत्री भवनात चित्रपट पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. इथे कार्यालयीन सचिव आणि कर्मचाऱ्यांशिवाय ५० माळी, चपराशी आणि इलेक्ट्रेशियन आहेत.

१०) इथे ऊर्जेची स्वतंत्र व्यवस्था आहे. एम्सचे डॉक्टर व नर्स इथे २४ तास ड्युटीसाठी आहेत. एक ऍम्ब्युलन्स आणि ६ BMW कार नेहमी पंतप्रधानांच्या ताफ्यात धावत असतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post