मोदी दुसऱ्यांदा सत्तारूढ : मैं नरेंद्र दामोदरदास मोदी.... म्हणत घेतली शपथ


DNALive24 : नवी दिल्ली
देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी सत्तारूढ झाले. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी....असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.  दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या साक्षीने मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्तापर्वास प्रारंभ झाला.

मोदीसोबतच राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, सदानंद गौडा, निर्मला सीतारमन आदींसह  58 मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली. महाराष्ट्रातून शिवसेना खासदार अरविंद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. मोदी 2.0 सरकारच्या खातेवाटपाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता विविध पक्षांचे दिग्गज नेते, कलाकार, उद्योगपती यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा रंगला. लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांसह अंबानी कुटुंब, शाहरुख खान, करण जोहर, कंगना राणावत यासारखे कलाकार उपस्थित होते.

43 वर्षीय स्मृती इराणी या मोदी मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. तर लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष असलेले 72 वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत.यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नरेंद्र मोदी - उत्तर प्रदेश

राजनाथ सिंह - उत्तर प्रदेश

अमित शाह - गुजरात

नितीन गडकरी - महाराष्ट्र

सदानंद गौडा - कर्नाटक

निर्मला सीतारमन - तामिळनाडू

रामविलास पासवान - बिहार, (लोकजनशक्ती पक्ष)

नरेंद्र सिंग तोमर - मध्य प्रदेश

रवीशंकर प्रसाद - बिहार

हरसिमरत कौर बादल - पंजाब, (शिरोमणी अकाली दल)

थावरचंद गहलोत - मध्य प्रदेश

सुब्रह्मण्यम जयशंकर - निवृत्त परराष्ट्र सचिव

रमेश पोखरियाल निशंक- उत्तराखंड (माजी मुख्यमंत्री, भाजप)

अर्जुन मुंडा - झारखंड (माजी मुख्यमंत्री, भाजप)

स्मृती इराणी - उत्तर प्रदेश

डॉ. हर्ष वर्धन - नवी दिल्ली

प्रकाश जावडेकर - महाराष्ट्र

पियुष गोयल - महाराष्ट्र,

धर्मेंद्र प्रधान - ओदिशा

मुख्तार अब्बास नक्वी - उत्तर प्रदेश

प्रल्हाद जोशी - कर्नाटक

अरविंद सावंत - महाराष्ट्र, (शिवसेना)

महेंद्रनाथ पांडे - उत्तर प्रदेश

गिरीराज सिंह - बिहार

गजेंद्र सिंह शेखावत - राजस्थान

संतोष गंगवार -

इंद्रजीत सिंह - हरियाणा

श्रीपाद नाईक - गोवा

जितेंद्र सिंह - जम्मू काश्मिर

किरन रीजिजू - अरुणाचल प्रदेश

प्रल्हाद पटेल - मध्य प्रदेश

आर के सिंह - बिहार

हरदीपसिंह पुरी - पंजाब

मनसुख मांडवीय - गुजरात

फग्गनसिंह कुलस्ते - मध्य प्रदेश

अश्विनीकुमार चौबे - बिहार

अर्जुन मेघवाल - राजस्थान

व्ही के सिंह - उत्तर प्रदेश

कृष्णपाल गुर्जर - हरियाणा

रावसाहेब दानवे - महाराष्ट्र

किशन रेड्डी - तेलंगणा

पुरुषोत्तम रुपाला - गुजरात

रामदास आठवले - महाराष्ट्र (रिपाइं)

साध्वी निरंजन ज्योती - हिमाचल प्रदेश

बाबुल सुप्रियो - पश्चिम बंगाल

संजीव कुमार बालियान - मुजफ्फरपूर

संजय धोत्रे - अकोला

अनुराग ठाकूर - हिमाचल प्रदेश

सुरेश अंगडी - बेळगाव

नित्यानंद राय - बिहार

रतनलाल कटारिया - पंजाब

वी मुरलीधरन - केरळ

रेणुका सिंह सरुता - छत्तीसगड

सोमप्रकाश - पंजाब

रामेश्वर तेली - आसाम

प्रतापसिंह सारंगी - ओदिशा

कैलाश चौधरी - राजस्थान

देबश्री चौधरी - पश्चिम बंगाल

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates