पालकमंत्री राम शिंदेंकडून कोट्यवधींचा भ्रष्टाचार : अ‍ॅड. शेवाळे यांचा आरोप


DNALive24 : अहमदनगर
जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप अ‍ॅड. कैलास शंकरराव शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडिल शंकर बापू शिंदे यांनी मौजे चौंडी, रा. जामखेड, जि. अहमदनगर येथील सर्वे नं. 2/3 या जागेवर चौंडी ते अरणगाव रस्ता व चौंडी ते देवकरवस्ती रस्ता या दोन्ही रस्त्यांवर शासकीय जमीनीत अतिक्रमण करुन बंगला बांधला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन बंगल्याचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी अ‍ॅड. कैलास शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केली.

तसेच याबाबतचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. अतिक्रणाबाबत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागीतली जाईल असा ऍड. शेवाळे यांनी दिला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भष्ट्राचार आणि अतिक्रमणाचा विषय उपस्थित झाल्याने पालकमंत्र्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post