“हीच वेळ ..हीच संधी ..लक्ष्य – विधानसभा २०१९ !!


मुंबई – 
युवासेना अध्यक्ष ‘आदित्य ठाकरे’ यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. युवासेनेचे पदाधिकारी वरून सरदेसाई यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. वरून सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस बंधू आहेत.

“हीच वेळ आहे..हीच संधी आहे..लक्ष्य – विधानसभा २०१९ !! महाराष्ट्र वाट पाहतोय” अशी पोस्ट वरून देसाई यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली असून, आदित्य ठाकरे यांना देखील टॅग केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post