अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर काळाच्या पडद्याआड


DNALive24 : वेब न्यूज, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांचे बुधवारी, ५ जून २०१९ रोजी सकाळी निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. वृद्धापकाळाने झालेल्या आजारांमुळे निधन झाले. दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर दुपारी ३.३० वाजता वरळी येथील प्रेयर हॉलमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिन्यार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘पद्मश्री दिन्यार कॉन्ट्रॅक्टर खास होते कारण त्यांनी कायमच आनंद पसरवला आहे. त्यांच्या अभिनयाने कित्येकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.’ असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

१९६६ साली त्यांनी आपल्या अभिनयातील प्रवासाला सुरुवात केली होती. विनोदी भूमिकामुळे दिन्यार नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील. चित्रपटातील अतुलनीय योगदानामुळे २०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. ‘बाजीगर’ आणि ‘बादशाह’सारख्या बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

‘बाजीगर’, ‘३६ चायना डाऊन’, ‘खिलाडी’, ‘बादशाह’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. तसेच ‘खिचडी’, ‘कभी इधर कभी उधर’ आणि ‘हम सब एक है’ सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नाटकातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. हिंदीसोबतच दिन्यार यांनी गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post