खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या


वेब टीम, अहमदनगर

सर्जेपुरात एकास मारहान करून खुनाचा प्रयत्न करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

आरोपी उमेश शकुर खान उर्फ शेख असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शेख हा प्रेमदान हाडको, सावेडी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस मन्सुर सय्यद, मनोहर गोसावी, रवींद्र कर्डीले, दिनेश मोरे, अजय बेरड, राहुल सोळंके, सचिन कोळेकर यांच्या पथकाने आरोपी उमेर शकुर खान ऊर्फ शेख (वय-32 रा. प्रेमदान हडको, सावेडी अ.नगर) हा सर्जेपुरा चौक नगर येथे येणार असल्याची माहीती नुसार सापळा रचवून त्याला ताब्यात घेतले. व पुढील कारवाई साठी तोफखाना पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मागर्दशनाखील करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post