आलिबाग येथे हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेट उघड ; एका अभिनेत्री सह 13 जणींना अटक


वेेेब टीम : मुुंबई
अलिबागमध्ये एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्ज रॅकेटचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते.

अलिबागच्‍या किनारपट्टी भागात बर्थडे पार्टीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेला लागली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने किनारपट्टी भागातील एका बंगल्याच्या वॉचमनकडून या व्यवसायांत असणाऱ्या दलाल राखी नोटानी व रंजिता सिंग ऊर्फ रेणु यांचा मोबाईल नंबर घेऊन फोन केला. त्यानंतर त्या दोघींनी काही रक्कम पोलिसांना दिलेल्या बँक खात्यात भरायला सांगितली. त्यानंतर राखी व रंजिता यांनी युवतीची नावे कळवून सौदा केला व दोन बंगले ऑनलाइन बुक करायला सांगितले.
स्थानिक गुन्हे पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्यांना बंगल्यावर पाठविले. राखी व रंजिता यांचा मॅनेजर आधीच आलेला होता. बनावट ग्राहकांनी पैसे देऊन पीडित मुलींना रूममध्ये नेले. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकांनी पोलिसांना मिस्ड कॉल देऊन इशारा दिला. त्यानंतर स्थानिक गुन्हे पथक पंचासह बंगल्यात दाखल झाले. त्यानंतर महिला पोलीस अधिकारी व पंचांनी मुलीची झडती घेऊन रक्कम जप्त केली. तर राखी व रंजिता यांच्याकडे अनुक्रमे 15 व 11 ग्राम असे 26 ग्राम कोकेन हे अमली पदार्थ आढळले.

स्थानिक गुन्हे पथकाने आज आरोपी व पीडित महिलांना ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी व पीडित महिला यांना न्यायालयात हजर केले असता पीडित मुलींना कर्जत येथील सुधारगृहात राखवलीसाठी दाखल केले आहे. तर आरोपीना पोलीस कोठडी सुनावली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post