केडगाव दुहेरी हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्यावा; ठुबे व कोतकर कुटुंबाची मागणी


वेब टीम : अहमदनगर
 केडगाव येथील  हत्याकांड प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई होत आहे. या घटनेचा तपास  सीबीआय किंवा विशेष अन्वेषण विभागाकडे द्यावा व अन्य सहभागी आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी रविवारी (दि.23) अनिता ठुबे व सुनीता कोतकर यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, खासदार सदाशिव लोखंडे, उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, संग्राम कोतकर, प्रमोद दुबे, मदन आढाव आदी यावेळी उपस्थित होते.
 शिवसेनेच्या दोन पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली त्याचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असून त्यातील फरार आरोपींना अद्याप पर्यंत अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास गेली एक वर्षापासून सीआयडी पुणे करीत असून त्यांनी आजपर्यंत एकाही फरार आरोपीला अटक केलेला नाही.  आमदार शिवाजी कर्डिले याची मुलगी माजी उपमहापौर र सुवर्णा कोतकर ही फरार असून ती  आमदार कर्डिले यांच्या घरी राहत असून तिला अद्याप पर्यंत अटक केली नाही. तसेच दर शनिवारी दर्शनाला शनिशिंगणापूर येथे दर्शनाला जात असते. या संदर्भामध्ये सीआयडी यांना लेखी व तोंडी माहिती देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी त्यांना अटकही केली नाही, त्याचप्रमाणे देवस्थानचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले नाहीत ते तपासले असते तर आरोपी सापडले असते. याचा अर्थ तपासी अधिकारी जाणीवपूर्वक फरार आरोपींना अटक करत नसून त्यांना मदत करतात, मुख्य फरारी आरोपी अटक झाल्यास या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे तपासातून उघड होईल. म्हणून या गुन्ह्याचा तपास सीआयडी, पुणे यांच्याकडून काढून तो सीबीआय किंवा स्पेशल अन्वेषण पथक यांच्याकडे देण्यात यावा. तसेच सदर खून खटला हा न्यायालय सरकारची बाजू मांडण्यासाठी व आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा त्या दर्जाचा अभिव्यक्तीची नियुक्ती करावी. अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
केडगाव येथील गुन्ह्याच्या तपासात अनेक त्रुटी दिसून येत असून या गुन्ह्यातील आमदार  शिवाजी कर्डिले यांचे बुऱ्हाणनगर येथील घर, आमदार संग्राम जगताप यांचे आयुर्वेदिक कॉलेज येथील कार्यालय,  त्याचप्रमाणे राजश्री हॉटेल व भानुदास कोतकर यांचे केडगाव येथील घर या मधील सर्व ठिकाणचे घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर नष्ट करण्यात आलेला आहे. व तो पुरावा नष्ट करण्यासाठी गायब करण्यात आलेला आहे. तरी हे पाहता सदर तपास हा सीआयडीकडून केला जात नाही, म्हणून सदर गुन्ह्याचा तपास हा तात्काळ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी ठुबे व कोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates