मावा बनवणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा


वेब टीम, अहमदनगर
मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत एकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महारूप अजीज शेख असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारा कडून माहित समजली की, काठवण खंडोबा परिसरात राहणाऱ्या महारूप अजीज शेख हा घराशेजारील खोलीत सुगंधी सुपारी व तंबाखू पासून मशिनच्या साह्याने प्रतिबाधीत मावा तयार करत असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे एलसीबीचे ज्ञानेश फडतरे , सोन्याबापु नाणेकर, दत्ता गव्हाणे, मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, मयूर गायकवाड, रणजीत जाधव, राहुल सोळुंके, रोहित मिसाळ, कमलेश रूट व अन्न औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी महारुख शेख याच्या घरावर छापा टाकला. यात पोलीसानी 1लाख 68हजार किमतीची 1120 किलो सुपारी , 34 हजार 320 किमतीची सुगंधी सुपारी व 55 हजार रुपयाचा मावा तयार कारनाच्या मशनिरी असा 2 लाख 57 हजार 320 रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates