मान्सून लांबला ; आठवडाभरात राज्यात


वेब टीम : पुणे
“वायू’ चक्रीवादळ संथ झाल्यानंतर आता मान्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले आहेत. कर्नाटकापर्यत दाखल झालेल्या मान्सूनच्या आगामी वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या चोवीस तासांत तो कर्नाटकातील आणखी काही भागात दाखल होण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने कळविले आहे. दरम्यान, यानंतर म्हणजे या आठवड्याच्या अखेरच्या टप्प्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे.

“वायू’ चक्रीवादळामुळे थांबलेला उत्तरेकडील प्रवास सुरू करत शुक्रवारी मान्सून दक्षिण कर्नाटकाच्या म्हैसूर मंगळुरूपर्यंत पोहचला आहे. त्याच्या आगामी वाटचालीसाठी सध्या योग्य स्थिती असल्याने येत्या चोवीस तासांत कर्नाटकाच्या काही भागांत दाखल होईल. महाराष्ट्रात मान्सून आठवड्याच्या शेवटच्या टप्यात दाखल होण्याची शक्‍यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post