किरणला न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा


वेब टीम, अहमदनगर

स्टेशन रोडवरील किरण जगताप ऊर्फ प्रेम याच्या हत्याकांडातील आरोपींना तत्काळ अटक करावी. गुन्ह्यातील अॅट्रॉसिटीचे कलम वाढवावे, खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात किरणचे आई-वडीलही सहभागी झाले होते.  किरण यांची हत्या किरकोळ कारणातून झाली आहे. पुणे बसस्थानकासमोर झाली होती दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यूूू झाला होता. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. किरण जगताप याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम ओळखल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना मोर्चातील शिष्टमंडळाने निवेदन दिले. हत्याकांडातील जबाबदार असणा-यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात हिंदूराष्ट्र सेनेचे दिगंबर गेंट्याल, शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत गायकवाड, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, विजय गायकवाड, किरण घोरपडे, निलेश बांगर चंद्रकांत पाटोळे, आकाश त्रिभुवन, उमेश साठे आदी सहभागी झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post