महिलेचा गळा आवळून खून ; अपघाताचा बनाव


वेब टीम : शेवगाव
तालुक्यातील शेवगाव- मिरी रोडवरील एका हॉटेलच्याकडेला महिलेचा मृतदेहाची सापडला होता. तिचा मृत्यू अपघातामुळे झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटत होते. परंतु उत्तरीय तपासणीत सदर महिलेचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आज सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्योती सर्जेराव ऊर्फ बाळासाहेब गायके (वय 27, रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) हे मयत महिलेचे नाव आहे. तिचा भाऊ दीपक तुपे (रा. शिराळ, ता. पाथर्डी) यांच्या पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, 23 मे रोजी मिरी-शेवगाव रोडवर मिरी शिवारातील हॉटेल दोस्तीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. रस्त्याच्या कडेला हा मृतदेह सापडल्याने तिचा मृत्यू अपघातामुळे झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात मयत ज्योती गायके यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिचा मृत्यू आवाजाने झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालावरून तिच्या भावाने आज सायंकाळी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक मंदार जावळे, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांकडे चौकशी सुरू केली आहे. मात्र तिचा खून नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नव्हता. सदर महिलेच्या खुनाच्या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates