पाकिस्तानचा विकासदर घसरणार


वेब टीम : इस्लामाबाद
जून महिन्यात समाप्त आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरून ३.३ टक्क्यांवर येईल, असा अंदाज पाकिस्तानच्या आर्थिक समीक्षा अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. पाकिस्तानने या वर्षी ६.३ टक्के आर्थिक विकासदराचे उद्दिष्ट ठरवले होते. त्या तुलनेत ३.३ टक्के विकासदर म्हणजे पाकिस्तानची आर्थिक घडी खूपच विस्कटण्याची चिन्हे दिसत आहेत. आर्थिक समीक्षा अहवालानुसार पाकिस्तान जवळजवळ सर्व क्षेत्रांचे विकास उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. .

आर्थिक वर्ष २०१८-१९ चा समीक्षा अहवाल पुढील अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर पसिद्ध केला जातो. ११ जून रोजी पाकिस्तानचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. त्यानुसार १० जून रोजी समीक्षा अहवाल पसिद्ध करण्यात आला आाहे. अहवालातील माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये केवळ पशुपालन या एकमेव क्षेत्राने विकासाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. इतर सर्व क्षेत्रांची कामगिरी खूपच खराब झाली आहे. औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट ७.६ टक्के ठरवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र १.४ टक्के दरानेच औद्योगिक विकास झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post