पेमेंट बँकांना यापुढे परवानगी नाही


वेब टीम : नवी दिल्ली
सध्या तरी नवीन पेमेंट बँकेसाठी परवाने जारी करणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. पेमेंट बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर नवीन परवाने जारी करण्याबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.छोट्या वित्त बँकांच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर या संबंधातील मार्ग खुले केले जातील. ऑगस्टमध्ये स्मॉल बँकांसाठी मार्गदर्शक नियम जारी केले जातील व त्यानंतर सर्वांचा सल्ला घेऊन अंतिम मार्गदर्शक नियम जारी होतील व नंतर अर्जांसाठी मार्ग खुले केले जातील.रिझर्व्ह बँक पुढील २-३ वर्षांमध्ये नवीन व्यावसायिक बँक व पेमेंट बँक यांना परवाना देण्याच्या विचारात नाही. विद्यमान बँकांच्या कामांमध्ये प्रथम स्थिरता यावी, असे रिझर्व्ह बँकेला वाटते. रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, छोट्या वित्त बँकांची भूमिका आर्थिकतेबाबत चांगली राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या परवान्यांबाबत विचार केला गेला आहे. या स्थितीमुळे छोट्या बँकांचा मार्ग खुला झाला आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post