शहर सहकारी बँकेचे खाते हॅक ; खात्यावरून पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न फसला


वेब टीम : अहमदनगर
सायबर गुन्हेगारांनी शहर सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेच्या अकाउंट  मधील 45 लाख रुपयांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न बँकेच्या सतर्क अधिकाऱ्यांनी हाणून पाडला.
शहर सहकारी बँकेचे अधिकारी तन्वीर शेख यांनी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत शाखेमध्ये चालू खाते आहे. रविवारी बँकाना सुट्टी होती. सुट्टीच्या दिवशी शहर बँकेच्या खात्यातून 45 लाख रुपये वर्ग झाल्याचे एसेमेस बँकेच्या अधिकार्‍यांना आले. हे पैसे 27 वेगवेगळ्या बँक खात्यावर वर्ग झाले. शहर बँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आयडीबीआय बँक ही कल्पना दिली.

आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे वर्ग झालेली काही बँका ती तात्काळ गोठवली. त्यामुळे शहर बँकेच्या मोठ्या रकमेची फसवणूक टाळली. मात्र सहा लाख रुपये आणखी वेगळ्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत. या पैशाबाबत पोलीस तपास करत आहेत. मंगळवारी शहर बँकेच्या अधिकाऱ्यां

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates