शौचालय अनुदान लाटणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार


वेेेब टीम : अहमदनगर
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांचे अनुदान घेऊनही शौचालये न बांधणार्‍या आठ लाभार्थ्यांविरोधात मनपाकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून या संदर्भात करण्यात आलेल्या कारवाईच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे.

मनपामार्फत सुमारे २६०० लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचे अनुदान देण्यात आलेले आहे. त्यातील सुमारे २५० लाभार्थ्यांनी अनुदान घेऊनही शौचालये बांधलेली नाहीत. या संदर्भात नगरविकास विभागानेही बैठक घेऊन १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील दोन तीन दिवसांत केडगाव परिसरात सुमारे १५ शौचालयांची रखडलेली कामे मार्गी लागली आहेत.

मात्र, वारंवार सूचना देऊनही कामे न करणार्‍या व अनुदान लाटणार्‍या आठ लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. याबाबतच्या कारवाईचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१४) मनपाकडून याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगण्यात आले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates