खा. सुजय विखे पाटलांचा अधिकारी- कर्मचाऱ्यांना खणखणीत इशारावेब टीम, कर्जत
राज्यसरकारने छावन्यांचे पैसे दिले असतानाही केवळ प्रशासकीय आधिका-यांच्या चुकीच्या धोरणामुळे ते दिले गेले नाहीत. ही बाब आपण राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटून सांगणार असून शेतक-यांसाठी प्रसंगी जिल्हाधिकारी यांचे कार्यालया समोर आंदोलन करू असा इशारा खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांनी कर्जत येथे टंचाई आढावा बैठकीत दिला आहे

भाजपचे नवनिर्वाचीत खासदार डाॅ. सुजय विखेपाटील यांनी आज पासून नगर दक्षिणमध्ये दुष्काळा आढावा बैठक घेण्यास कर्जत पासून सुरवात केली आहे. यावेळी प्रथमनगराध्यक्ष नामदेव राउत, तालुका अध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हाबॅंकेचे संचालक अंबादास पिसाळ, दादासाहेब सोनमाळी, सभापती साधना कदम, उपसभापती प्रंशात बुध्दीवंत, राजेंद्र गुंड,नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक शहाणे, शांतीलाल कोपनर, धनराज कोपनर, संभाजीराजे भोसले, प्रसाद ढोकरीकर, अंगद रूपनर, संजय भैलुमे , दिग्विजय देशमुख, सार्वजणीक बांधकाम विभागाचे श्री भोसले, तालुका कृषिआधिकारी दिपक सुपेकर, गटविकास आधिकारी मुकूंद पाटील, उपविभागीयकृषि आधिकारी श्री गायकवाड, कुकडीचे आभियंता श्री साठे, बीएसएनलचे श्री पवार, नगरपंचातीच्या नगरसेविका, विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, कामगार तलाठी, सर्व विभागाचे शासकीय आधिकारी उपस्थित होते.

छावनी चालकांची अडवणूक थांबवा

यावेळी डाॅ. सुजय विखे म्हणाले कि दुष्काळ पडला आहे, याला सामोरे जाण्याची सर्वांची जबाबदारी आहे. यामूळे आधिका-यांनी या बाबत चालढकल करू नये, आज शेतक-यांची जणांवराची काळजी छावनी चालक घेत आहेत मात्र त्यांनी छावनी सुरू केल्या पासून बिले मिळाली नाहीत यामुळे अनेकांना व्याजाने पैसे काढून छावनी चालवावी लागत आहे बिलांवर अनेकांच्या आधिकारी व कर्मचारी यांच्या सहया घेणे त्रासदायक प्रकार आहे यामुळे जिल्हयातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये मदत कक्ष सुरू करावा यामध्ये रोज दोन तास संबधीत आधिकारी यांनी थांबावे म्हणजे छावनी चालकांचे हाल होणार नाहीत. तसेच सरकारने एप्रिल अखेरचे पैसे दिलेले असतानाही आधिका-यांमुळे हे पैसे छावनी चालकांना मिळत नसल्याने सरकारची बदनामी होत आहे आणि ही बाब फार गंभीर आहे यामध्ये जिल्हाधिकारी यांनी पर्यायी उपाय योजना करण्याची गरज आहे तसेच पुढिल पंधरा दिवसामध्ये सर्व छावनी चालकांचे पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येईल असे श्री विखे म्हणाले तसेच यावेळी छावनी चालकांना टॅकर देणे तसेच नागरीकांना पुरेसे पाणी देण्यासाठी सुरू असलेले टॅंकर त्यांच्या होणा-या खेपा तसेच आतिरीक्त टॅंकर ठेवणे या बाबत त्यांनी नायब तहसीलदार यांना सुचना दिल्या.

यावेळी छावनी चालकांच्या वतीने बोलताणा बापुसाहेब नेटके म्हणाले कि, छावनी चालकांचे बिले आॅडीटच्या नावाखाली मोठया प्रमाणावर अडविले जात आहे नगर येथिल आॅडीट करणारे आधिकारी पैसे मागतात त्यांना कोणी पैसे दयावयाचे तसेच पावसाळा सुरू होणार असल्याने चारा डेपो सुरू करावेत म्हणजे त्या शेतक-यांना चारा देता येईल अशी मागणी केली.

स्वप्नील देसाई यांनी कर्जत शहरामध्ये 26 दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे यामुळे तातडीने टॅकर सुरू करावेत अशी मागणी केली.

यावेळी अंबादास पिसाळ यांनी शेतक-यांचे पिक विमा पैसे आणि जिल्हा बॅंकेची भूमीका यावेळी मांडली.

यावेळी दादासाहेब कानगुडे , रघूनाथ काळदाते, विष्णू देमुडे,यांचे सह अनेकांनी छावन चालाकांचे अडचणी माडंताणा रोज नवीन जीआर व होणारी अडवणूक यांच्या तक्रारीचा पाढा वाचला डिक्सळचे सरंपच यांनी गावातील पाणी टंचाई नवनाथ तपुनरे यांनी वडगाव मधील पाण प्रश्न तर भिमा नदीचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत करावे अशी सुचना शेतक-यांनी यावेळी केली

यावेळी गटविकास आधिकारी मुकूद पाटील यांनी प्रस्तावीक केले तर अभार दिपक सुपेकर यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post