खासदार डाॅ. सुजय विखे यांनी घेतली शेख कुटुंबियांची भेट


वेब टीम, पारनेर

ढवळपुरी( ता.पारनेर ) येथे मंगळवार दि. ६ रोजी दुपारी एकाच कुटुंबातील तीन चुलत भावंडांचा काळू डॅम परिसरातील खाजगी मालकीच्या शेततलावात पोहण्यासाठी उतरले असताना त्यांचा अंत झाला. त्यामुळे ढवळपुरी व परिसरात शोककळा पसरली आहे. भाळवणी परिसरातूनही या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

शेख कुटुंबातील तीन चुलत भावंडांचा एकाच वेळी अपघाती मृत्यू झाल्याने गुरूवारी रात्री उशिरा त्यांच्यावर मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शुक्रवारचा आठवडे बाजार व संपूर्ण गाव बंद ठेवून दुखवटा पाळण्यात आला.

तर दुपारी खासदार डाॅ. सुजय विखे, विधानसभेचे उपाध्यक्ष ना.विजयराव औटी, सभापती राहुल झावरे, साई मल्टिस्टेटचे चेअरमन वसंतराव चेडे यांनी ढवळपुरी येथे जाऊन शेख कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. ताराबाई चौधरी, पोपटराव चौधरी, सरपंच राजेश भनगडे , अजित सांगळे , पोलीस पाटील अहमद पटेल व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post