लोकसभेचे उपाध्यक्षपद हक्काने मागतोय : उद्धव ठाकरे


वेब न्यूज : कोल्हापूर
केंद्रात नवे सरकार अस्तित्वात आले आहे, मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे आणि आता सरकारचे कामकाजही सुरु झाले आहे. परंतु संसदेच्या सभागृहातील कामकाज अद्याप सुरु झालेले नाही. लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अजून शिल्लक आहे. एनडीएतील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे यासाठी मागणी केली आहे. आमची इच्छा आहे की आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावे. उपाध्यक्षपद आम्ही हक्काने मागत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भारतीय जनता पक्षासोबत हिंदुत्वासाठी युती केली आहे, पदांसाठी नाही. लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळावी ही आमची इच्छा आहे. आम्ही ते पद हक्काने मागत आहोत. आपली माणसं म्हटल्यावर हक्क आलाच.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post