पब जी गेमच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्याDNALive24 : अहमदनगर
राहूरी तालुक्यातील आंबी या परिसरात pubji या गेम मुळे 18 ते 19 वयाच्या फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या कडेला असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. pubji गेम च्या नादात या युवकाने आपली जीवनयात्रा संपविली अशी प्राथमिक चर्चेत समोर आले आहे.

ही घटना प्रथम त्याच्या भावाने शाहरुख मन्सूर इनामदार याने पहिली असता त्याने प्रथम आंबी येथील पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे याना भ्रमणध्वनी द्वारे दिली असता त्यांनी देवळाली पोलीस स्टेशन ला माहिती दिली. लगेच देवळाली येथील पोलीस हेड कॉ. पाठक व शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा केला असून तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post