'अभिनंदन' यांच्या मिशीला 'राष्ट्रीय मिशी' घोषित करा


वेब टीम : दिल्ली
लोकभेच्या अधिवेशनात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना काँग्रेसच्या मागणीने सभागृहात गोंधळ उडाला. काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी हि विचित्र मागणी केली.

बालाकोट एयरस्ट्राइकनंतर पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करणाऱ्या भारताच्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याला पुरस्कार देण्याच्या मागणीबरोबरच त्याच्या मिशीला राष्ट्रीय मिशी म्हणून घोषित करण्याची विचित्र मागणी केली.

लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी भाषण करताना मोदी सरकारवर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर देखील मोठ्या प्रमाणात टीका केली. या भाषणात त्यांनी बालाकोट हवाई हल्याचा उल्लेख केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates