संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या मैदानात


वेब टीम : अहमदनगर
संभाजी ब्रिगेड येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली आहे. संभाजी ब्रिगेडने गेल्या 20 वर्षापासून विविध विषयावर काम केले असून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण यावर आपली भुमीका स्पष्ट करुन ये त्या विधानसभेत जिल्हयात सर्व उमेदवार देणार असल्याची घोषणा केली आहे.
नगर येथे कार्यकर्त्यांचा मेळावा नगर येथील अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रवक्ते शिवानंद भानुसे, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, केंद्रीय कार्यकारणी सदस्य सोमनाथ नवले, सचिव संघटक डॉ.संदीप कडलग, विभागीय अध्यक्ष नाशिक विभाग प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष टिळक भोस, उत्तर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुंड, माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, माजी महानगराध्यक्ष अतुल लहारे, सुदाम कोरडे, युवराज चिखलठाणे, निलेश बोरुडे, प्रशांत औटी, प्रवीण भोर, मंजाबापू गुंजाळ, शंकर धोंड, राजेंद्र खोजे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबांधीत करताना प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले की, गेल्या 20 वर्षापासून सामाजिक काम करत असताना संभाजी ब्रिगेडने राज्यभरात काम उभे केले आहे. खरा इतिहास बहुजन समाजासमोर आणला आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवकांच्या प्रश्नांवर वारंवार आवाज उठवला आहे मराठा आरक्षण, शेतकर्‍यांचे आंदोलन,  हिंदू - मुस्लिम ऐक्य, दलित चळवळीची माहिती, बहुजन समाजातील महामानवांचा इतिहास तळागाळात पोहचवणे तसेच इतिहासाचे विक्रृती करणार्‍यांना चाप बसवण्याचे काम आजपर्यंत संभाजी ब्रिगेडने केले आहे. सर्व समाजात एकोपा राखण्यासाठी संभाजी ब्रिगेडची भुमीका कायम राहिली आहे. यातुन आता 80 टक्के समाजाकारण आणि 20 टक्के राजकारण या धरतीवर आणि शेतकर्‍यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात ठोस

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates