वेब टीम : मुंबई सोमवरपासून प्रारंभ होत असणार्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे ...
वेब टीम : मुंबई
सोमवरपासून प्रारंभ होत असणार्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-4 या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीस ज्येष्ठ आ.गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी, जयंत पाटील ही नेतेमंडळी उपस्थित होती. संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विरोधपक्ष नेत्यांशी सोमवारपासून सुरु होत असणार्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे म्हणाले की, पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीत विरोधीपक्षांच्या कोणत्या चर्चा व विषयांचा आग्रह आहे, त्याबाबत विरोधी पक्ष नेत्यांशी बैठकीत चर्चा झाली. कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये सत्ताधार्यांंबरोबर विरोधकांना तितकेचे महत्त्व असते.
अधिवेशनामध्ये जनतेच्या दृष्टीने चांगल्या विषयांना न्याय देण्याच्या दृष्टीने व त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते चर्चेने एकत्र सोडविण्याबाबत विरोधकांनी सहमती दर्शविली. विरोधी पक्षांना सोबत घेऊनच विधीमंडळाचे कामकाज यशस्वी होत असते त्यादृष्टीने आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना आवाहन केले असून विधीमंडळ अधिवेशनाचे कामकाज नक्कीच व्यवस्थितपणे पार पडेल असा विश्वास संसदीय कार्यमंत्री तावडे यांनी सांगितले.
COMMENTS