भारताने उडवला दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा, ६ गडी राखून विजयी सलामी


DNALive24 : वेब न्यूज
भारताच्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडविला. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २२८ धावांचा पाठलाग करतांना भारताने ६ गडी राखून पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. यंदाच्या विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

रोहित शर्माच्या धमाकेदार फलंदाजीने व यजुर्वेंद्र चहलच्या दमदार गोलंदाजीने भारताने हा विजय मिळविला. रोहित शर्माची शतकी खेळी आणि युजवेंद्र चहलच्या तूफान गोलंदाजीमुळे (4/51) भारताने 228 धावांचं लक्ष्य पार अखेर केलं.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेला 50 षटकांत केवळ 227 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने 48 षटकांत चार गडी गमावत हे आव्हान पार केलं.

भारताचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माने या सामन्यात 128 चेंडूंमध्ये शतक साजरं केलं. रोहितचं वन डे कारकीर्दीतलं हे तेविसावं आणि विश्वचषकातलं दुसरं शतक होत. या सामन्यात भारतीय विजयाच्या आशा या रोहितवरच केंद्रित झाल्या होत्या. रोहित 122 धावांवर नाबाद राहिला. रोहित आणि धोनी या जोडीने विजयासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. ४७ व्या षटकात फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने तीन चौकार मारत विजय मिळवून दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post