किडन्या काढून घेण्याची धमकी, एकाने घेतला गळफास


DNALive24 : वेब न्यूज, अहमदनगर
पैसे न दिल्यास तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ अशी धमकी दिल्याने नगरमध्ये एकाने राहत्या घराच्या छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी मयताच्या भावाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हकीगत अशी की, मयत अंकुश कालिदास सरोदे, वय- 30 याने अमित चोरडिया (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याकडून 50 हजार रुपये व्याजाने उसने घेतले होते. ते पैसे परत घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. वेळोवेळी धमक्याही दिल्या होत्या. तसेच तुझ्या दोन्ही किडन्या काढून घेऊ असा दम दिला होता. या धमकी व जाचाला कंटाळुन अंकुश कालीदास सरोदे याने राहत्या घराच्या छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ कालिदास सरोदे राहणार -भगवान बाबा चौक, निर्मल नगर पाईपलाईन रोड, सावेडी. हल्ली राहणार ठाणे, याने अमित चोरडिया (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) विरोधात 1 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय सोनवणे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post