प्रीतम मुंडेंनी विचारला इंग्रजीतून प्रश्न, स्मृती इराणी यांनी दिले मराठीतून उत्तर


वेब टीम : दिल्ली
राज्यातील दुष्काळी मराठवाडा आणि बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून विशेष मदत मिळावी, अशी मागणी बीडच्या खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी लोकसभेत केली. मुंडे यांनी इंग्रजीतून हा प्रश्न मंत्री स्मृती महाजन यांना विचारला. मुंडे यांच्या या प्रश्नावर इराणी यांनी चक्क मराठीतून उत्तर देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

वस्त्रोद्योग मंत्री म्हणाल्या की, "मी महाराष्ट्राचीच असून मलाही शेतकऱ्यांच्या समस्या माहित आहेत, निश्चितच शेतकऱ्यांना मदत केली जाईल".

मुंडेंनी प्रश्न विचारल्यावर मलाही मराठी येतं, असे म्हणत स्मृती इराणींनी त्यांना उत्तर दिले. महिला आणि बालकल्याण विभागासह वस्त्रोद्योग खातेही स्मृती यांच्याकडेच आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग विभागाने कापूस उत्पादक जिल्ह्यांकडे लक्ष द्यावे, ज्याचा फायदा शेतकऱ्यांनाही होईल, अशी मागणी प्रीतम मुंडेंनी केली होती. शक्य ती मदत मराठवाड्याला केली जाईल, असे आश्वासन इराणी यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post