PUBG खेळण्यास मनाई केल्याने धाकट्या भावाने केली थोरल्या भावाची हत्या


वेब टीम : भिवंडी
आईच्या मोबाइलवर पबजी गेम खेळण्यास मनाई केल्याने 15 वर्षीय अल्पवयीन धाकट्या भावाने आपल्या 19 वर्षीय थोरल्या भावाच्या पोटात कैची खोपसून निर्घृण हत्या केली आहे. मोहम्मद हुसैन मोहम्मद अच्छे शाह असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपीला शांतीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौहान कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 70 जवळीस चाळीत शनिवारी (29 जून) ही घटना घडली आहे. आरोपी मोहम्मद फहाद याने आईचा मोबाइल घेऊन त्यावर तो 'पबजी' गेम खेळत होता. मोहम्मद हुसैन याने त्यास गेम खेळण्यास मनाई केली. एवढेच नाही तर मोहम्मद फहाद त्याच्या जवळील मोबाइल फोन हिसकावून घेतला. याचा राग मनात ठेऊन मोहम्मद फहाद याने हुसैनशी हुज्जत घातली. हुज्जतीचे पर्यवसन हाणामारीत झाले. फहाद याने घरातील कैचीने हुसैन याच्या पोटावर छातीवर सपासप वार करुन त्यास गंभीर जखमी केले. त्याला जखमी अवस्थेत स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांनी इतर पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद फहाद विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates