आप हैं तो हम हैं, राहुल गांधींना कार्यकर्त्यांनी लिहिलीत 'रक्ता'ने पत्रं


वेब टीम : पाटणा
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. मी माझा निर्णय बदलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर देशभरातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांना पदावरच राहण्यासाठी आग्रह केलाय. बिहारची राजधानी पाटण्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर राहुल गांधी यांना चक्क रक्ताने पत्र लिहीली आहेत.

तुम्ही अध्यक्षपद सोडू नका, आप हैं तो हम हैं, अशी भावनिक सादही त्यांनी राहुल गांधी यांना घातलीय. राहुल गांधी यांचं मन वळविण्यासाठी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते प्रयत्न करताहेत. मात्र राहुल गांधी ऐकण्याच्या तयारीत नाहीत. त्यामुळे देशभरातले कार्यकर्ते विविध उपक्रम राबवून राहुल यांचं मन वळविण्याचा प्रयत्न करताहेत.

पाटण्यातल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्ताने राहुल गांधी यांना आज पत्र लिहिलीत. काँग्रेसला तुमची गरज आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुमची गरज आहे. त्यामुळे तुम्ही पद सोडू नका अशी साद त्यांनी घातलीय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही सर्व पत्रं बिहारचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांच्याकडे दिली आहेत. झा ती पत्रं राहुल गांधी यांच्याकडे पोहोचविणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post