शेतकर्‍यांनी पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमानातील अनियमितता व कमी पाऊस व पावसातील कालावधीमध्ये मोठा खंड पडतो. त्यामुळे कृषी उत्पादनात मोठया प्रमाणात घट होऊन शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी ‘पंतप्रधान पिक विमा’ योजनांतर्गत जास्तीत जास्त  सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2016 पासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना खालील अटीनुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्टये - कर्जदार  शेतकर्‍यांना  योजना  बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छिक आहे.  खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी  या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतक-यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी   शेतक-यांनी  भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.  सर्व पिकांसाठी  70 टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. अधिसूचित  क्षेत्रातील  अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे  मागील 7 वर्षा पैकी सर्वाधिक उत्पन्नाच्या 5 वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर  विचारा घेऊन  निश्चित केले जाईल.

जिल्हयातील योजनेत समाविष्ट पीके विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता रक्कम -   जिल्हयातील अधिसूचित पिके- भात-  8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  40 हजार,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 800 रुपये,  बाजरी-  97 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  20 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 400 रुपये, भुईमूग- 86  मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 25 हजार, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 500 रुपये, सोयाबीन- 53 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  32 हजार 500,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 650रुपये, तिळ- 8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  12 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 250रुपये, सूर्यफूल- 8 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  23 हजार 100,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता  प्रति हेक्टर 462 रुपये , मूग- 59 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर 17 हजार 500 हजार,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 350 रुपये, तूर- 79 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  31 हजार 500,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 630रुपये, उडीद- 15 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  17 हजार  500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 350 रुपये, कापूस- 62 मंडळात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  38 हजार 750 रुपये,  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 1 हजार 938 रुपये, मका- 05 मंडळात, विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  27 हजार 500, शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता प्रति हेक्टर 550 रुपये व कांदा- 11 तालुक्यात विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टर  60 हजार  शेतक-यांनी भरावयाचा पीक विका हप्ता रक्कम प्रति हेक्टर 3 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post