लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला : चंद्रकांत पाटील


वेब टीम : सांगली
भाजपाचे जेष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना पिंगा घालायला लावला, असे खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील कार्यक्रमात केले आहे.
सांगलीतील हिंदकेसरी पै मारुती माने पुतळा अनावरण कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीरदादा गाडगीळ , आदर्श सरपंच भीमराव माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त केले असून लोकसभा निवडणुकीत आम्ही पवारांना जेरीस आणले. मात्र ते थोडक्यात वाचले असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले. पवारांना तिथेच अडकवून ठेवत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला आणि त्यांचे सर्व बालेकिल्ले आम्ही उद्ध्वस्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्षावर देखील टीका केली. काँगेसने बहुजन समाजाला भाजपासून दूर ठेवले. भाजप हा ब्राह्मणाचा पक्ष असल्याचे लोकांच्या मनात बिंबवले गेल्याचे पाटील म्हणाले. तर वर्षानुवर्षे काँगेसने भाजप पक्षाचा बागुलबुवा उभा करुन बहुजन समाजाचे नुकसान केले असे म्हणत काँग्रेसच्या नितीवर पाटील यांनी टीका केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post