शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन


वेब टीम : अहमदनगर
शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश त्रिभुवन यांची बिनविरोध झाली. अध्यक्ष पदासाठी अभय शेळके पाटील, जगन्नाथ गोंदकर व अर्चना कोते यांनी अर्ज दाखल केले होते. तिघेही विखेंचे कट्टर समर्थक होते.

अखेर आज गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर अध्यक्षपदी अर्चना उत्तमराव कोते तर उपाध्यक्षपदी मंगेश वामन त्रिभुवन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, रवी गोंदकर, शिवसेनेचे विजय जगताप, माजी अध्यक्ष अलका शेजवळ, मावळते उपाध्यक्ष सुजित गोंदकर, अ‍ॅड अनिल शेजवळ, पोपट शिंदे, नितीन कोते, नितीन शेजवळ, अशोक गोंदकर, दत्तात्रय कोते, हरीचंद्र कोते, कविता सुनील निकम विकास  गोदकर नितिन अशोकराव कोते पोपट शिदे उत्तम कोते ताराचंदा कोते निलेश कोते  उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates