भाजपकडून जागावाटपाचा नवीन फॉर्म्युला; शिवसेनेत अस्वस्थता


DNALive24 : मुंबई
लोकसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर भाजप-शिवसेनेत विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा धुसफूस सुरु झाली आहे. लोकसभेआधी मित्रपक्षांना जागा सोडून उरलेल्या फिफ्टी-फिफ्टी हा फॉर्म्युला ठरला होता. मात्र आता शिवेसना-भाजपा १३५-१३५ जागांवर लढतील तर १८ जागा मित्रपक्षांना, असा भाजपाचा नवीन प्लॅन आहे. त्यातील मित्रपक्ष हे भाजपाच्या चिन्हावर लढले तर भाजपाच्या जागा आपसुक वाढणार आहेत. भाजपच्या या नव्या फॉर्म्युल्याने मात्र शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.

लोकसभा निवडणुकांआधीच भाजपा आणि शिवसेनेची विधानसभेसाठी देखील फॉर्म्युला ठरवून युती झाली होती. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा फॉर्म्युला घोषित करण्यात आला होता. विधानसभेच्या २८८ पैकी शिवसेना १४४ आणि भाजपा १४४ जागा लढवेल, असा हा फॉर्म्युला होता. मात्र चंद्रकांत पाटील यांनी आता भाजपा १३५, शिवसेना १३५ तर मित्रपक्ष १८ असा नवीन फॉर्म्युला सांगितला आहे. मित्रपक्ष हे भाजपाचेच आहेत. मित्रपक्षाने देखील भाजपाच्याच चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपाचा प्रयत्न असणार आहे. सध्या रासपचे नेते व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मात्र रासप भाजपाच्या चिन्हावर नाही तर आपल्या स्वत:च्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

जागावाटपाच्या संख्येसोबतच काही जागांवरूनही दोघांमध्ये ठिणगी उडणार आहे. अमित शहा यांना भेटून त्यांच्या कानावर ही बाब घालण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post