सुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या राज्यपाल?


DNALive24 : वेब टीम, नवी दिल्ली
माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. त्यांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. त्यांच्यवर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाजन या मध्यप्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. तेथील भाजपच्या काही नेत्यांनी सुमित्रा महाजन यांना आतापासूनच शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. भाजपने इंदूरमधील उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्यामुळे महाजन नाराज झाल्या होत्या. त्यांनी पत्र लिहून नाराजी दाखवून दिली होती. तुम्हाला मला उमेदवारी न देण्यास संकोच वाटत असेल, तर मीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेते, असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यात न उतरण्याचा निर्णय घेतला होता.

सुमित्रा महाजन या 'ताई' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदूर ही कर्मभूमी आहे. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत आहेत. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून सुमित्रा महाजन तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्या 16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावर वर्णी लागणार का? याबाबत उत्सुकता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post