सुशीलकुमार शिंदे होणार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष?


वेब टीम : दिल्ली
लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या जागेवर सुशील कुमार शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे पक्षांतर्गत बैठकांमध्ये सांगितले. सोबतच, पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील असावा त्यांचा आग्रह होता. यानंतर चर्चेत आलेल्या नावांपैकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते.

काँग्रेसने एकमताने सुशील कुमार यांना अध्यक्ष पद देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अधिकृत घोषणेसाठी आणखी काही वेळ लागू शकतो. तत्पूर्वी राहुल गांधींचे उत्तराधिकारी होण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अशोक गलहोत, जनार्दन द्विवेदी आणि मुकुल वासनिक यांच्यासह माजी संरक्षण मंत्री ए.के. अॅण्टोनी यांच्या नावांचा प्रस्ताव होता. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील दलित नेते सुशील कुमार शिंदे यांचा देखील पराभव झाला. मीडिया रिपोर्टनुसार, अंतर्गत चर्चेत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता ते लवकरच राहुल गांधींची भेट घेणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post