बालकांवरील हल्ल्यानंतर मनपाकडून कुत्र्यांची धरपकड


वेब टीम : अहमदनगर
शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पुन्हा दोन बालके जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी घडल्या नंतर महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी हा विषय गांभिर्याने घेत शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याची धडक मोहीम राबविण्याचे आदेश संबंधित विभाग आणि खाजगी संस्थेला दिल्यानंतर बुधवारी(दि.३) सकाळपासून मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम जोरात सुरु करण्यात आली आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात पुन्हा दोन बालके जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी घडली. या घटनेमुळे शहरासह उपनगरी भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून महापालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत असा जाब राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना विचारला.


शहरातील भिस्तबाग चौक येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दुर्गा पिंपळे ही ११ वर्षीय बालिका आणि कोहिनूर मंगल कार्यालयासमोरील वसाहतीत आयुक्तांच्या घराजवळ अवधूत गायकवाड हे ४ वर्षीय बालक जखमी झाले. अशा घटना वारंवार घडत असल्याने महापालिकेच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी बुधवारी (दि.३) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, प्रा माणिकराव विधाते, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे,विनीत पाऊलबुद्धे, दीपालीताई बारस्कर, अजिंक्य बोरकर, सुनील त्रिंबके, बाळासाहेब बारस्कर, बाळासाहेब पवार आदींच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जावून आयुक्त भालसिंग यांची भेट घेतली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post