ट्रक- कारच्या अपघातात ९ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू


वेब टीम : सोलापूर
सोलापूर-पुणे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळेजण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.

कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर ट्रक आणि कारची धडक झाली, त्यात या 9 जणांचा मृत्यू झाला. मयत विद्यार्थी हे यवतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजित मुलाणी अशी मयताची नावे आहेत.
शुक्रवार सकाळी हे सर्वजण यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते. ट्रीप आटोपून हे सर्वजण आज घरी येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे - सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडून ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post