मुलीवर अत्याचार करून खुनाचा प्रयत्न, गाव पुढाऱ्यांवर गुन्हा


वेब टीम : अहमदनगर
मागासवर्गीय मुलीवर बलात्कार  व तिचा खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिला राहत्या घरातून बाहेर काढून गावातून हाकलून दिले. या घटनेबाबत श्रीगोंद्यातील  राजकीय नेते मंडळींसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बळजबरीने  तिच्या तोंडात विष पाजून खुनाचा प्रयत्न केला. तिच्या वर दौंड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये लखन कुमार काकडे, श्रीगोंदा कारखाना व बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे, सुधीर नलगे, भाऊ नलगे, कुमार काकडे, सांगवी दुमालाच्या सरपंच शुभांगी नलगे, स्नेहल काकडे-भोसले (सर्व रा. सांगवी दुमाला, ता. श्रीगोंदा) आदीचा समावेश आहे. याबाबत मंगळवारी रात्री  श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पीडित युवतीने फिर्याद दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सन 2014 पासून लखन काकडे हा दलित मुलीची छेड काढून  तिचा विनयभंग करीत होता. वारंवार शरीरसुखाची मागणी करीत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याने तिच्याविरुद्ध बळजबरीने शारीरिक अत्याचार केला. याबाबत तक्रार देण्यासाठी युवती श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आवारात गेली असता तिला पोलीस ठाण्यातून हाताला ओढून नेले होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post