सोन साखळ्यांची चोरी करणारी इराणी टोळी जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
चैन स्नेचिंग करणाऱ्या इराणी टोळीच्या अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीने  अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्ह्यात समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीतील दोघांनी मार्च २०१९ मध्ये नेप्ते गावच्या हद्दीमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसका मारून चोरून नेली होती. या घटनेत महिला गाडीवरून पडून जखमी झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
आझादअली युसूफ सय्यद उर्फ इराणी (वय-३७), आयुब उर्फ भुऱ्या फैय्याज इराणी (वय-५०), अलरजा उर्फ अल्लीबाबा शब्बीर बेग उर्फ इराणी (वय-४५) आणि अकबर शेरखान पठाण (वय-३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी साहेबराव गंगा बरबडे (वय-५७ रा. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक दिलीप मोहिते यांना गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हे श्रीरामपूर येथील राहणारे असून त्यांनी हा गुन्हा केला आहे. तसेच आरोपी त्यांच्या घरी आले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चारजणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post