'ट्रम्प यांच्या मध्यस्थी प्रस्तावावर भारताची प्रतिक्रिया आश्चर्यकारक' : इम्रान खान


वेब टीम : वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानदरम्या चर्चा व्हावी यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रस्तावावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक असल्याचं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान यांनी ट्विट करत भारताच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या ७० वर्षांपासून कोणताही तोडगा निघू न शकलेल्या काश्मीर मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला असताना त्यावर भारताने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. काश्मीरमधील जनतेच्या अनेक पिढ्यांनी खूप काही सोसलं असून अद्यापही रोज हालअपेष्टा होत आहेत. लवकरच या मुद्द्यावर तोडगा काढला पाहिजे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post