सव्वा रुपयात लग्नविधी : श्री श्रमिक बालाजी ट्रस्टचा उपक्रम, ऑगस्टमध्ये श्री व्यंकटेश्‍वर कल्याणम्


वेब टीम : अहमदनगर
सामाजिक भान बाळगत सावेडीतील श्री श्रमिक बालाजी ट्रस्टने यंदाही सव्वा रुपयांत लग्न सोहळा हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नवरा-नवरीला कपडे, संसारोपयोगी साहित्य आणि मंगळसूत्र संस्थानतर्फे देण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट रोजी हा सामुदायिक विवाह सोहळा होत आहे.

     साईबाबांच्या शिर्डीत सव्वा रुपयांत सामुदायिक विवाह सोहळा नगरच्या श्रमिक बालाजी ट्रस्टीने पाहिला. तेथून पुढं नगरला आपणही असा उपक्रम सुरू करावा असा विचार ट्रस्टींच्या मनात आला. 2007 साली या उपक्रमाची सुरूवात झाली. यंदाचे हे 12 वे वर्षे आहे. सामाजिक कार्यकर्तेश्रीनिवास बोज्जा यांचे वडील सुरेश हे प्रत्येक वर्षी नवरदेवाला कपडे तर पुण्याचे राहुल येमुल हे नवर्या मुलीला शालू देतात. गंजबाजारातील साई ट्रेडर्सच्यावतीने मंगलसूत्र दिले जाते.

सावेडीतील श्रमिकनगर परीसरात श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था ट्रस्ट 26 व्या महोत्सवी वषानिमित्त श्री व्यंकटेश्‍वर कल्याणम सोहळा करणार आहे. शनिवार (दि.10 ऑगस्ट) होणार्या याच सोहळ्यात सव्वा रूपयात सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

     दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सामान्य माणसाला विवाहाचा खर्च परवडत नाही.  सामुदायिक विवाह ही त्यामुळे काळाची गरज बनली आहे. या सोहळयात सर्व हिंदू धर्मातील सर्व जातीच्या वधू वरांना सहभागी करून घेतले जाते. सामुदायिक विवाहात सहभागी होवू इच्छिणार्‍या वधू-वरांनी आपली नावे 1 ऑगस्टपर्यंत श्री श्रमिक बालाजी मंदिरात नोंदवावी असे आवाहन मंदिर ट्रस्टीने केले आहे.

देणगीदार फिक्स

     सामुदायिक विवाह सोहळ्यात ट्रस्टी सगळ्या खर्चाचे नियोजन करते. सामुदायिक विवाह सोहळ्याचे देणगीदारही ठरलेले आहे. दरवर्षी ते कपडे, भांडे, सोने देतात. याशिवाय ज्यांना दान देण्याची इच्छा असते ते इच्छेनुसार दान देतात. ट्रस्टी त्यासाठी कोणाकडे आग्रह करत नाही. लोकांनी लोकांसाठी आयोजित केलेला हा विवाह सोहळा असल्याची भावना यातून वाढीस लागली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post