‘मॉब लिचिंग’ करणार्‍यांना फाशी द्या ; मुस्लिम बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


वेेेब टीम : अहमदनगर
'मॉब लिचिंग’द्वारे अल्पसंख्याक समाजाची हत्या करणार्‍यांना फाशीच्या शिक्षा द्या, अल्पसंख्यांकासाठी संरक्षण कायदा करावा. आदी मागण्यांसाठी शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात शहरातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.


आज दुपारचे नमाज पठण केल्यानंतर मुस्लिम बांधव कोठला परिसरात एकत्र जमा झाले. कोठला, मंगलगेट, रामचंद्र खुंट, भूजल सर्वेक्षण कार्यालयासमोरील मोकळी जागा असा मोर्चा काढण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यघटनेने सर्व भारतीयांना धर्माप्रमाणे राहण्याचा व जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र काही कट्टरवादी मानसिकतेचे समाजकंटक देशाला तोडण्याचे षडयंत्र करीत आहेत. नियोजनबद्ध पद्धतीने अल्पसंख्यांक समाजाची ‘मॉब लिचिंग’द्वारे हत्या केली जात आहे. झारखंड येथील तबरेज अन्सारी या अल्पसंख्यांक मुस्लिम युवकाला काही समाजकंटक लोकांनी अमानुषरित्या मारले. या घटनेमुळे अल्पसंख्यांक समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कडक कायदा करावा, ‘मॉब लिचिंग’द्वारे हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. असे खटले ‘फास्टट्रॅक कोर्टा’त चालवावेत. आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post