वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाच्या रकमेत वाढ, वाचा कशाला किती दंड?


वेब टीम : दिल्ली
अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार कठोर तरतुदी करणार आहे. यासाठीच आज लोकसभेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन दुरुस्ती विधेयक सादर केले. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड वाढविण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.

तशाच काही शिक्षाही प्रस्तावित आहे. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यातही वाढ करण्यात आली आहे. आता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना 10 लाखांपर्यंत तर गंभीर जखमी झालेल्यांना 5 लाखांपर्यंतच्या मोबदला मिळणार आहे.

वाहतूक नियमांतील दंड अधिक कठोर
दारु पिऊन गाडी चालवल्यास दंड 2000 वरुन 10,000 पर्यंत वाढवण्याची तरतूद
हेल्मेट न घालवून गाडी चालवल्यास 1000 रुपये दंड आहे पण आता 100 दंड कायम ठेवत तीन महिन्यांसाठी वाहतूक परवाना जप्तीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
बेदरकारपणे गाडी चालविण्याचा दंड 1,000 वरुन 5000 रुपयांवर वाढला.
वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड 500 रुपयांवरुन 5000 रुपयांवर करण्यात आला आहे.
वेगमर्यादेपाक्षा जास्त वेगात गाडी चालवल्यास आता 5000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास दंड 100 रुपयांवरुन 1000 रुपयांवर करण्यात आला आहे.
मोबाइल फोनवर बोलत गाडी चालवल्यास आता दंड थेट 5000 रुपये इतका झाला आहे.
आपत्कालीन वाहनांना मार्ग न दिल्यास 10000 रुपये दंडाची तरतूद
अल्पवयात गाडी चालवल्यास कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. जर अल्पवयात गाडी चालवताना कुणी आढळल्यास त्याच्या पालकांना किंवा गाडीच्या मालकाला जवाबदार ठरवत त्याला 25000 दंड आकरण्यात येईल किंवा 3 वर्षांसाठी तुरुंगवसाची तरतूद करण्यात आली आहे.
ओव्हरलोडिंगासाठी 20,000 रुपयांचा दंड आकरला असून 1000 रुपये प्रति टन अतिरिक्त दंडाटी तरतूद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post