राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराच्या घरावर छापे


वेब टीम : कोल्हापूर
राष्ट्रवादीचे आमदार व कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर तसेच त्यांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाने आज, सकाळी छापे टाकले.

त्याचबरोबर त्यांच्या पुण्यातील मुलाच्या घरी आणि टाकाळा येथील त्यांच्या साडू यांच्या घरी देखील छापे टाकले आहेत.

छापे टाकणाऱ्या पथकातील अधिकारी कागदपत्रांची तपासणी करत आहेत. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तांचीही चौकशी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, आयकरचे पथक सकाळी साडेपाचच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांनी तेथे कागदपत्रांची तपासणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post