ते ९ मतदारसंघ आमचेच; राष्ट्रवादीचा दावा


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 3 हजार 433 बुथ कमिट्या असून त्यापैकी 3 हजारांच्या जवळपास बुथ कमिट्यांवर अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी 9 जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.

रविवारी नगरमध्ये राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्ष फाळके बोलत होते. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संगमनेर, शिर्डी आणि श्रीरामपूर वगळता अन्य तालुक्यातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. याबाबतचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे. पक्ष संघटनेचे काम जिल्ह्यात जोमाने सुरू आहे. राहाता, पाथर्डी आणि राहुरी मतदारसंघातील नगर आणि पाथर्डी तालुक्याचा भाग या ठिकाणी सदस्य नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे फाळके यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post