होय... पाटलांनीच दिली माझ्या हत्येची सुपारी...


वेब टीम : मुंबई
"पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. याची मी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शदर पवारांचे नातेवाईक आहेत." असा खळबळजनक आरोप अण्णांनी आपल्या जबानीत केला.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात मंगळवारी हजर झाले होते.

या सुनावणीत इतर आरोपींसह सध्या जामिनावर असलेले मुख्य आरोपी पद्मसिंह पाटीलदेखील उपस्थित होते.

तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आपण पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कार परत केले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणून मी शेवटचा उपाय म्हणून आपण उपोषणाला बसलो. त्यानंतर सरकारनं पी.बी. सावंत आयोगाकडे या भ्रष्टाचाराची चौकशी सोपवली.

चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र याचा राग मनात धरून, पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. तसेच ही तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव टाकला जाऊ लागला. एकदा माझ्या ऑफिसमध्ये येऊन पद्मसिंह पाटलांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्यांकडे एक कोरा चेक सोपवला, आणि सांगितलं हवी ती किंमत टाका, मी याचीही रितसर तक्रार दाखल केली. असे अण्णांनी कोर्टात सांगितले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post