पिक विमा सहभागी होण्यासाठी 24 जुलै ची अंतिम मुदत


वेब टीम : अहमदनगर
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2019 मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2019 जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीच्या आत पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी केले आहे.

सदर योजनेत सहभागी होण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेत सादर करते वेळी सर्व बिगर कर्जदार कर्जदार  आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधार कार्डची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावती खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडिट कार्ड किंवा नरेगा जॉब कार्ड किंवा वाहन चालक परवाना

सदर योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्ज खात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडण्यासाठी त्वरित बँकेशी संपर्क साधावा
अर्ज भरण्यासाठी बँकेमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सोपे जावे  म्हणून गाव पातळीवर अधिक सुविधा उपलब्ध करण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे याकरिता राज्यात कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्र सुविधा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाने सुरू केले आहे तरी शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत दिनांक 24 जुलै 2019 या अंतिम दिनांक पूर्वी जास्तीत जास्त संख्येने संख्येने सहभागी व्हावे यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच आपल्या या गावातील कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्याबरोबर नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा असे आव्हान प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post